आजपासून नव्या वर्षाचा नवा सूर्य उगवला... नवा संकल्प नववर्षाचा
नवा संकल्प नववर्षाचाआकाश पवार (शिराढोण, कळंब, धाराशिव)
आजपासून नव्या वर्षाचा नवा सूर्य उगवला,
हिंदूंच्या संस्कृतीचा दीप पुन्हा प्रज्वलला.
गुढी उभारून घेतो संकल्प नव्याने,
अत्याचाराच्या छायेत कधीही न वावरू याने!
ना करू अन्याय, ना सहन करू,
शौर्य, परंपरेला पुढे नेत राहू.
धर्म
नेते बोलतात, जनता जळते, त्यांच्या शब्दांनी दंगली पेटते... कोणासाठी जळतोय आपण?
कोणासाठी जळतोय आपण?आकाश पवार (शिराढोण, कळंब, धाराशिव)
नेते बोलतात, जनता जळते,
त्यांच्या शब्दांनी दंगली पेटते.
कोण कबर काढतो, कोण ठेवतो,
जनतेला मात्र दुःखच मिळतो.
मस्साजोगचा ताजा श्वास,
न्यायाची झाली तमा उदास.
नेते फक्त नाटक खेळत,
सत्याच्या दिव्याला वारं
गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर प्रवाह पिक्चरवर पाहा अजरामर चित्रपट अमर भूपाळी
उलगडणार मराठी चित्रपटांचा सुवर्णकाळ...
मराठी चित्रपटांच्या सुवर्ण इतिहासात अजरामर ठरलेला चित्रपट म्हणजे अमर भूपाळी. १९५१ साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट लवकरच ७५ वर्ष पूर्ण करणार आहे. व्ही शांताराम यांची निर्मिती आणि दिग्दर्शन असलेला हा चित्रपट अभिनेत्री संध्या, ललिता पवार आणि
विसर्जनासाठी गणपती नेताना मला मूर्ती अवजड झाली...
हस्तांतरद भा धामणस्कर (दत्तात्रेय भास्कर धामणस्कर प्रसिद्ध कवी. अहमदाबाद, गुजरात)
विसर्जनासाठी गणपती नेताना
मला मूर्ती अवजड झाली, तेव्हा
उसळत्या तारुण्याचा
माझा मुलगाच मला म्हणाला,
द्या इकडे
मी मूर्ती तत्काळ मुलाच्या हातावर ठेवली
चौरंगासहित
मुलानेही मूर्ती हातात घेतली
नीट सावरून
हा कसला विषारी उजेड वाढलाय? घरात घराबाहेर...
कसला विषारी उजेडअरुण म्हात्रे (अरुण जगन्नाथ म्हात्रे प्रसिद्ध कवी आणि गीतकार. मुंबई, महाराष्ट्र)
हा कसला विषारी उजेड वाढलाय?
घरात घराबाहेर
वस्तीवस्तीत गावागावातल्या चौकाचौकात
सारखा धूर येतोय उजेडातून... डोळ्यात घुसतोय...
दिसतच नाही पुढचे काही त्यात... ना वर्तमान... ना भविष्य...
धूर ओळखीचा
मला भेटलेल्या सुंदर स्त्रिया... आणि त्यांना बघून मला पडलेला प्रश्न.
मला भेटलेल्या सुंदर स्त्रिया...आशा तेरवडिया (पुणे, महाराष्ट्र)
रडणाऱ्या बाळाला कवटाळून शांत करणारी, चिऊ काऊची गोष्ट सांगून, त्याला घास भरवणारी, लेकाच्या आजारपणात रात्र-रात्रभर जागून त्याची देखभाल करणारी ही आई मला खूप सुंदर वाटली.
नातवंडांना वेगवेगळ्या गोष्टी
थोर आपण मानिली ही भ्रष्ट सारी माकडे...
भ्रष्ट सारी माकडेमंगेश पाडगांवकर (१९२९ - २०१५)
थोर आपण मानिली
ही भ्रष्ट सारी माकडे...
अन् दिले हातांत त्यांच्या
पेटलेले काकडे!
कां अता छाती पिटावी
लागतां आगी घरां...
देव येइल कोणता
हे निस्तराया सांकडे!
धर्म यांचा मारणे
सोयीप्रमाणे या उड्या...
याचसाठी लाभलेले
पाय यांना फाकडे!
काल ज्या
मला नाहीच कळत भावना कशा व्यक्त करतात?
उजवी बाजूप्रविण पावडे
दोघांनाही हवी
उजवी बाजू...
तुझी की माझी...
इतकच ठरवायचं होतं...
सारं काही कळतयं
कोणी वळायचं...
इतकच ठरवायचं होतं...
हारजीतच्या प्रश्नात
प्रतिस्पर्धी की सहचारी...
इतकच ठरवायचं होतं...
प्रविण पावडे यांचे इतर लेखन वाचा:
ज्येष्ठ मराठी कवी अरुण कोलटकर यांच्या भिजकी वही ह्या कवितासंग्रहातील कविता...
भिजकी वहीअरुण कोलटकर (१९३२ - २००४, अरुण बाळकृष्ण कोलटकर, साहित्य अकादमी पुरस्कार विजेते. कोल्हापूर, महाराष्ट्र)
ही वही कोरडी नकोस ठेवू
माझी वही भिजो
शाई फुटो
ही अक्षरं विरघळोत
माझ्या कवितांचा लगदा होवो
या नदीकाठचं गवत खाणाऱ्या
म्हशींच्या दुधात
माझ्या
ईर्षा, असूया, क्रोध गोवऱ्या करा रे या दुर्गुणांची होळी...
दुर्गुणांची होळीजयवंत शिंगटे
दुःख दारिद्र्य नैराश्यादि
सर्वांची या बांधून मोळी ।
ईर्षा, असूया, क्रोध गोवऱ्या
करा रे या दुर्गुणांची होळी ॥
मद, मत्सर, वाईट संगत
जीवनात ना तेणे रंगत ।
सद्गुण यांना असे गोडवा
नैवेद्याला करा अर्पण, त्यांचीच रे पुरणपोळी ॥
प्रसन्न होत होलिका माता
राधेचा रंग आणि कृष्णाची पिचकारी... रंगवा दुनिया सारी...
राधेचा रंग आणि कृष्णाची पिचकारीअंकुश पवार (ठाणे, बी.ए, एम.ए - मराठी साहित्य, इंडियन पॉलिटिक्स)
राधेचा रंग आणि कृष्णाची पिचकारी
प्रेमाच्या रंगात रंगवा दुनिया सारी
रंगीबेरंगी चेहरे दिसती रंगीबेरंगी पोशाख
सर्कशी मधील विदूषकाची जणू भासे शाख
गुलाल उघळु दे रंग सांडू दे
आनंदाच्या
स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा होणार सन्मान
खास प्रसंगी लक्ष्मीकांत बेर्डेंच्या आभासी फोनने सारेच गहिवरले...
स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळ्याची उत्सुकता दिवसागणिक वाढतेय. प्रवाह परिवाराच्या या दिमाखदार सोहळ्यात यंदा ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. मराठी आणि हिंदी
चष्मा लावलेले लोक हुशार असतात...
चष्मा लावलेले लोकडॉ.गणेश तरतरे (लेखक सर ज. जी. कला महाविद्यालय, मुंबई येथे चित्रकलेचे प्राध्यापक आहेत)
चष्मा लावलेले लोक हुशार असतात
असा लहानपणी समज होता...
उगाचच जवळच धुरस दिसू लागलं
जवळचा नंबर लागला!!!
डॉक्टर म्हणाले वयानुसार लागतो,
तसा तुम्हाला उशिराच लागला…
अलीकडे अलीकडे दुपारी देखील
धुक
८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त आरंभ आणि अंताचा प्रवास तू ही मराठी कविता...
आरंभ आणि अंताचा प्रवास तूअंकुश पवार
त्यागाचा चेहरा, प्रेमाचा आरसा तू
साक्षात देवीचं रुप भासते तू
ना तू अबला, ना बिचारी तू
गर्वाने पुढे चालते आजची नारी तू
क्रांतीबांची सावित्री, भीमरावांची रमाई तू
शौर्य-त्यागाचे प्रतिक झाली शिवबाची जिजाई तू
अत्याचार,
२८ फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने...
राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्तानेडॉ. विलास डोईफोडे
आपण आपल्या भारत देशामध्ये दरवर्षी २८ फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करतो. डॉ. चंद्रशेखर वेंकट रमण यांचं स्वातंत्र्यपूर्व काळात अर्थात २८ फेब्रुवारी १९२८ ला ‘रमण इफेक्ट’ हे संशोधन प्रकाशित झाले आणि या
मराठीच्या पाऊलखुणा शेकडो वर्षांपासूनी...
मराठीच्या पाऊलखुणाअंकुश पवार
पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
आपल्या घरात हाल सोसते मराठी
हे असे कित्येक खेळ पाहते मराठी
शेवटी मंदाथ तख्त फोडते मराठी
मराठीच्या पाऊलखुणा शेकडो वर्षांपासूनी
तरी अमराठी भाषांमध्ये अस्तित्व शोधते मराठी
हिंदीचा अतिरेख वाढला राजकीय मतांचा आधार ठरला
अनेक आधार निराधार
दि. ३ मार्च २०२४ रोजी केंद्र शासनाकडून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला...
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा : भविष्यातील दिशाअंकुश पवार (अंकुश नारायण पवार, ठाणे)
महाराष्ट्राला अनेक वर्षांपासून संत वाङ्मयाची परंपरा लाभलेली आहे. संत ज्ञानेश्वरांनी देखिल मराठी भाषेवरील प्रेम व अभिमान आपल्या ओव्या व कविता यांमधुन व्यक्त केल्या आहेत.
तुझी फुले तुलाच वाहतो, स्वार्थ यात मी माझा पाहतो...
तुझी फुलेडॉ. विलास डोईफोडे
तुझी फुले तुलाच वाहतो
स्वार्थ यात मी माझा पाहतो
शब्द तुझे स्वरसाज तुझा
काळवेळ ही तुझी
भूपाळीचा सुर मी आळवितो
तुझी फुले तुलाच वाहतो
श्रीफळ तुझे बेलपत्र तुझेच
अबीर गुलाल तुझा
विधात्यास श्रद्धेने मी पुजितो
तुझी फुले तुलाच वाहतो
समिधा तुझी तूप ताप तुझा
चुकीचे वृक्षारोपण करणाऱ्या लोकांना थांबविणे गरजेचे आहे. अन्यथा हिरवळ दिसेल, मात्र जैवविविधता दिसणार नाही...
विदेशी झाडे का नकोत?श्रीकृष्ण पंडित (रत्नागिरी, महाराष्ट्र)
मादागास्कर येथून भारतात आलेल्या गुलमोहराने, ऑॅस्ट्रेलियातून भारतात आणल्या गेलेल्या निलगिरी १९७२ साली आयात केलेल्या गव्हा (मिलो) बरोबर भारतात आलेली सुबाभूळ,
रंग शोभे लाल या लालपरीला ही आपली माय स्वराजंली, वंदनिय लालपरी...
वंदनिय लालपरीधनराज बाविस्कर
रंग शोभे लाल । या लालपरीला ।
ही आपली माय । स्वराजंली ॥ १ ॥
स्टाप, फाटे, फुटे । घेते सारी जणा ।
ही मराठ मोडी । अग आहे ॥ २ ॥
जीव लागला हा । तिच्यात ग सारा ।
आयुष्य बांधल । माझं सार ॥ ३ ॥
ती कणखर या । देशाची ती परी ।
संसाराची लक्ष्मी । या
ही सांधसांध आहे, येथे उगाच आता, येथे कुणी नसावा, जर आपलाच आता...
एकटाच आतामनोज शिरसाठ
ही सांधसांध आहे, येथे उगाच आता
येथे कुणी नसावा, जर आपलाच आता...
गोतावळा जगाचा, सांगायचा मला जो
पडक्या घरात आहे, तो एकटाच आता...
फडताळ आठवांचा, इतका भरून आहे
मी शोधतो तरीही, येथे मलाच आता...
अज्ञान वेदनांचे, तू ठेवना उराशी
समजू नको कशाला, अण फक्त
सतीश राजवाडे यांची नवी मराठी मालिका आई आणि बाबा रिटायर होत आहेत...
२०० आठवडे सातत्याने आघाडीवर रहात स्टार प्रवाह वाहिनीने संपूर्ण महाराष्ट्रात आपला दबदबा निर्माण केला आहे. स्टार प्रवाहच्या सर्वच मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत. प्रेक्षकांच्या अभिरुचीचा अभ्यास करुन त्यांना आपलेसे वाटतील असे मालिकेचे विषय, घरातील सदस्य वाटावीत अशी पात्र
अवसेच्या भयान रात्री आनंदी सूर यावा...
अवसेच्या भयान रात्रीअभिषेक घुगे
अवसेच्या भयान रात्री आनंदी
सूर यावा,
जळताना देह माझा प्रेमाचा धूर
यावा,
जमतील स्मशानी आप्त,
ओठी त्यांच्या हसु असावे,
स्मृति चे गाठोडे माझ्या
तिथे च जळून जावे,
असेल लावली हजेरी
त्या वेडीने शोक सभेला,
होऊन मुक्त माझ्यातून
नवा जन्म लाभो तिला...
साकडं नारायणाला की
नात्यांची वीण असते नाजूक, नात्यांना जपावे लागते खूप...
नाजूक नात्यांची वीणउमा पाटील
नातेसंबंध...
नात्यांची वीण असते नाजूक
नात्यांना जपावे लागते खूप
तुटेल इतके ताणू नयेत संबंध
नेहमी जपावेत नात्यांचे बंध
चूक जर झाली असेल दुसऱ्याकडून
लगेच द्यावी माफी तुमच्याकडून
जर तुम्ही चुकला असाल
तर माफी मागावी खुशाल
तेच रटाळ गाणे वाजवू नये
कधी कधी अस्तित्वाचा विचार असा साप बनून येतो अंगावर...
थांब तिथेचअरुण म्हात्रे (अरुण जगन्नाथ म्हात्रे प्रसिद्ध कवी आणि गीतकार. मुंबई, महाराष्ट्र)
थांब तिथेच
पाऊल नको उचलूस
वळू नकोस हलू नकोस
जाऊ दे वेळेचा अजगर
शांतपणे
मानेवरून
छातीवरून
कमरेतून वळसे घेत
मांड्यातून
पायापर्यंत...
ढिम्म रहा
एकदम चिडीचूप
मेल्यासारखा
निपचित...
सरकू दे